आनंदपीठाचा यूथफुल कॅम्पः मैत्री दिनी साजरा झाला सहजीवन आणि मैत्री यूथ कॅम्प!
१९ ते २५ वयोगटातील तरुणांसाठी आनंदपीठाच्या माध्यमातून सहजीवन- मैत्री यूथ कॅम्पचे आयोजन. तरुणांमध्ये प्रेम, सद्भावना, आदर जिव्हाळा या मूल्यांची पेरणी करण्यासाठी झालेला रसरशीत निवासी कॅम्प.
इंदुमती जोंधळे आणि महावीर जोंधळे या आंतरजातीय लग्न केलेल्या ज्येष्ठ जोडप्याने, तर विशाल विमल आणि डॉ. आरजू तांबोळी या आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडीने तरूणाईशी गप्पा मारल्या. डॉ. नीरज जाधव आणि डॉ. चेतना जाधव ही डॉक्टर जोडी समुपदेशनासाठी होती. मानसशास्त्रज्ञ प्रा. सृष्टी रावणगावकर यांनीही व्यक्तिगत समुपदेशन केले.
सर्जनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मुक्त चित्रकार सचिन निंबाळकर सोबत होतेच.
