आनंदपीठ'ला फॉलो करा :

वी द चेंज फाउंडेशन

We The Change Foundation

This social organisation dreams of a new world. Of course, it also strives to make that dream a reality !

“Sowing the seeds of a Happy world, built on equality and love.” This is the organization’s one-line ‘vision document’.The organization hopes to reach the idea of India to the new generation, sow it, instill it, and build an India on such constitutional values.

For this, Anandpeeth is being set up in the scenic village of Bhalgudi in the Kolvan Valley, in Mulshi-Maval of Pune district. We have named this area ‘Bhalgudi Days’. Here, ‘Anand Peeth’ means an enlightened, enthusiastic ashram that sows dreams of a new world.

Now the only way to change the world is to talk with young minds!

We need your love & support for the cause.

Let’s sow the seeds of a new world together !

वी द चेंज फाऊंडेशन

‘वी द चेंज फाऊंडेशन’ ही नव्या जगाचं स्वप्न पाहणारी सामाजिक संस्था आहे. आणि अर्थातच, हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ती सातत्याने प्रयत्नशील आहे.

“समानता आणि प्रेमाच्या पायावर उभ्या असलेल्या आनंदी जगाची पेरणी” हे संस्थेचं एका वाक्याचं ‘व्हिजन डॉक्युमेंट’. आयडिया ऑफ इंडिया नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, त्यांच्या मनात रुजावी आणि संविधानिक मूल्यांवर भारताची उभारणी व्हावी, हे संस्थेचं उद्दिष्ट.

याच उद्देशाने पुणे जिल्ह्यातील मुळशी-मावळ परिसरातील निसर्गरम्य कोळवण खोऱ्यातील भालगुडी या गावात ‘आनंदपीठ’ उभारण्यात आलं आहे. संस्थेच्या अनेक प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वाचा प्रकल्प. या परिसराला आम्ही नाव दिलं आहे. ‘भालगुडी डेज्’ ! इथलं ‘आनंदपीठ’ म्हणजे एक आश्रमच. नव्या जगाची स्वप्नं पेरणारा. विचारांना नवी दिशा देणारा. उत्साहाने भारलेला. प्रबोधनाची वाट दाखवणारा.

नव्या पिढीची स्वप्नं पूर्ण करायची असतील तर या तरूणाईशी बोलायला हवं. म्हणून, आमचा प्रयत्न आहे नव्या पिढीशी बोलण्याचा. त्यांच्या सोबतीनं नव्या जगाचं स्वप्नं प्रत्यक्षात आणण्याचा.

या स्वप्नासाठी, या प्रयत्नासाठी..

तुमच्या प्रेमाची, सोबतीची आणि सहकार्याची आम्हाला गरज आहे.

चला, नव्या जगाची बीजं एकत्र पेरूया !