आनंदपीठ'ला फॉलो करा :

उपक्रम

आनंदपीठ पालक कॅम्प, जून २०२६

पालक कॅम्पचे उद्घाटन, पर्यावरण उद्योजकांच्या हस्ते संपन्न

पालकांच्या कॅम्पचे उद्घाटन पर्यावरण उद्योजक सागर अहिवळे आणि आरती अहिवळे यांच्याहस्ते संपन्न झाले. देशात आणि जगभरात पर्यावरणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला असताना सागर आणि आरती अहिवळे यांचे कार्य अधिक ठळक होते. खरं तर त्यांनी भविष्यात वाढत जाणाऱ्या पर्यावरण प्रश्नाचे गांभीर्य ओळखून अनेक वर्षांपूर्वीच यासंदर्भात कृतीशील पावले टाकायला सुरुवात केली होती. आज त्यांच्या कामाने उद्योगांमुळे पर्यावरणाची होणारी हानी टळण्यास मदत होत आहे. अनेक उद्योगांना पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि प्रशासन (ईएसजी) मानकांशी जोडण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आरती यांनी भारत-नॉर्वे हरित सामरिक भागीदारी परिषदेत भारताच्या उद्योग प्रतिनिधी मंडळात उद्योजिका म्हणून नेतृत्व केलेले आहे.

टीनएजर्सशी संवाद साधण्याचा प्रभावी मार्ग. कलेच्या माध्यमातून संवाद. नाटककार अतुल पेठे यांचे सत्र

टीनएजर्सशी संवाद कसा साधायचा, असा मोठा प्रश्न पालकांना पडलेला असतो. पण यावर प्रभावी व सर्जनशील उपाय सांगितला तो नाटककार अतुल पेठे यांनी. कलेच्या माध्यमातून टीनएजर्सशी सुसंवाद साधला जावू शकतो, याबद्दल नाटककार अतुल पेठे यांनी पालकांच्या कॅम्पमध्ये पालकांशी संवाद साधताना सांगितले.

ग्लोबल शिक्षण व करिअर

डब्लिन (आयर्लंड) येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये ‘भारतातील ऊसतोड कामगार स्त्रियांचे मानसिक आरोग्य’ या विषयात पीएच.डी. करणारी आणि शिकवणारी पुण्याची सायली सहस्रबुद्धे. लातूरहून शिक्षणासाठी पुण्यात आलेला आणि सध्या युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज विभागात संशोधन करणारा आणि तिथे शिकवणारा अभिषेक भोसले. हे दाम्पत्य आनंदपीठावर आलं. आणि मुलांच्या शिक्षणाची व करिअरची चर्चा वैश्विक पातळीवर गेली. अभिषेक यांनी ग्लोबल करिअर, शिक्षणाला असलेला वैश्विक आयाम यावर भाष्य केले. सायली यांनी पालकांचं मानसशास्त्र यावर पालकांशी संवाद साधला.

मेडीटेशन : सुदृढ आरोग्यासाठी अनिवार्य - सोनी जाधव, कॅम्प डायरेक्टर, योग प्रशिक्षक

मुलांची काळजी घेत असताना पलकांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे. कॅम्पच्या डायरेक्टर व योग प्रशिक्षक सोनी जाधव यांनी पालकांकडून मेडिटेशनचे विविध प्रकार करवून घेतले.

पालकांनी नेमकं काय करायचं? - डॉ. राजीव तांबे, शिक्षणतज्ज्ञ व सर्जनशील बालसाहित्यकार

बदलत्या काळात मुलांसोबत वाढताना किंवा त्यांना घडवताना पालकांनी नेमकं काय करायचं?, हा मोठा प्रश्न पालकांसमोर असतो. त्यावरच डॉ. राजीव तांबे सरांनी आनंदपीठाच्या पालक कॅम्पमध्ये मार्गदर्शन केलं.

राजीव तांबे सर सर्जनशील बालसाहित्यकार म्हणून महाराष्ट्राला माहिती आहेतच. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी त्यांनी देश विदेशात अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. अभिनव शिक्षणपद्धतींवर त्यांचा विशेष भर आहे.

बाल साहित्यातील विशेष योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये मानाच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले आहे.

सरांनी मुलांसाठी कथा, कविता, कादंबरी, एकपात्रिका, द्विपात्रिका, एकांकिका, नाटक, संवादकथा, बोलक्या गोष्टी, विज्ञानकथा, विज्ञान प्रयोगकथा, विज्ञान भयकथा, फॅंटसीकथा, रुपककथा, प्राणीकथा, साहसकथा, रहस्यकथा, भाषेचे खेळ, गणिताचे खेळ, शून्य खर्चाचे विज्ञानाचे प्रयोग, शिक्षणविषयक लेखन अशा विविध 29 साहित्य प्रकारात लेखन केले आहे.

‘युनिसेफ’ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत त्यांनी शिक्षण सल्लागार म्हणून काम केले आहे.

स्क्रीनबाहेरचे निसर्ग सौंदर्य- पर्यावरण तज्ज्ञ अनिकेत मोताळेंचे सत्र

सतत स्क्रीनमध्ये डोकावता डोकावता खरे निसर्ग सौंदर्य पाहण्याचं आपण विसरुन गेलो आहोत. पर्यावरण अभ्यासक अनिकेत मोताळे यांनी घेतलेल्या सत्रात पालकांना निसर्ग अनुभवाची एक वेगळी दृष्टी दिली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आनंदपीठात हा निसर्ग आनंद द्विगुणित झाला. सर्व पालकांसोबत नेचर वॉक करत त्यांनी आजुबाजूची झाडे, पक्षी, कीटक, डोंगर, दऱ्या, झरे यांची शास्त्रीय माहिती दिली.

‘किशोर’चे संपादक किरण केंद्रे बोलताना.

केंद्रे हे किशोरवयीन मुलांसाठीच्या ‘किशोर’ या मासिकांचे संपादक आहेत. गेली अनेक वर्ष ते हे मासिक यशस्वीरित्या चालवतात. फार पूर्वीपासूनच त्यांनी किशोरवयीन मुलांचे विषय हाताळलेले आहेत. पालकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आनंदपीठाने उपलब्ध करुन दिली.

शिक्षणाच्या ग्लोबल वाटा, आयर्लंड विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. नानासाहेब थोरात

‘तिकडे ट्रकड्रायव्हरला डॉक्टरांपेक्षा जास्त पगार आहे’, अशा उदाहरणांसह डॉ. नानासाहेब थोरात यांनी जेनझींना जगभरातील शिक्षणाचा व रोजगाराचा दृष्टीकोन सांगितला.

भारतात स्पर्धा परिक्षांमुळे शिक्षणाची संकुचित झालेली व्याख्या यावर त्यांनी भाष्य केले. ऑक्सफर्ड तसेच इतर विद्यापीठांमध्ये असणारी शिक्षण पद्धती, सध्या विविध विषयांना जगभरात असणारी मागणी यावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

साताऱ्यातील मायनी या गावात जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या नानासाहेब यांनी भारतातच एमएससी, पीएचडी केली. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठापर्यंतचा प्रवास केला. भौतिकशास्त्र हा त्यांचा अभ्यासाचा विभाग असून कर्करोग, नॅनोमेडिसिन यात त्यांचे संशोधन आहे.

आनंदपीठ लोकवक्ता करंडक!

आनंदपीठ लोकवक्ता करंडक!

लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृत्यर्थ आनंदपीठ लोकवक्ता करंडक स्पर्धा मोठ्या उत्सवाने अनंदपीठावर पार पडली. लोकवक्त्यांची परंपरा अबाधित ठेवण्यासाठी आनंदपीठाचा हा प्रयत्न.

महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण अशा सर्व विभागातील एकूण ७५ स्पर्धकांचा सहभाग घेतला. नियोजित आणि उत्स्फूर्त अशा दोन फेऱ्यांतून लोकवक्त्याची निवड करण्यात आली.

५१ हजार, ४१ हजार आणि ३१ हजार अशी प्रथम तीन पारितोषिके आणि ११ हजाराची ७ उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

लोकनेते अजित पवार यांच्या स्मृत्यर्थ- आनंदपीठ लोकवक्ता करंडक

आनंदपीठ @भालगुडी डेज

कोण होणार आवाज महाराष्ट्राचा!

लोकनेत्यांची मांदियाळी असलेल्या महाराष्ट्रात आज लोकनेते कुठे आहेत? लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील, असे आज लोकवक्ते कुठे आहेत?

आम्ही शोध घेतोय अशा प्रभावी आणि प्रामाणिक लोकवक्त्यांचा. महाराष्ट्रातील नामवंत परीक्षक ठरवतील महाराष्ट्राचा महा-लोकवक्ता!

तुमची सामाजिक अथवा राजकीय भूमिका कोणतीही असो. मात्र, तुमचे नाते हवे लोकांशी. बांधीलकी हवी भूमिकेशी. शब्दांचा फुलोरा नको फक्त, आशय हवा तेवढाच सशक्त.

लोकनेते अजित पवार यांच्या स्मृत्यर्थ- आनंदपीठ लोकवक्ता करंडक

२१ आणि २२ मार्च २०२६

सह्याद्रीच्या कुशीतील कोळवण खोर्‍यात आहे, आनंदपीठ @भालगुडी डेज

पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर, पवना डॅमपासून, तिकोना किल्ल्यापासून वीस मिनिटांवर. या रम्य आनंदपीठावर रंगेल ही वक्तृत्व स्पर्धा.

हा परिसर बघूनच, तुम्हाला ऐकू येईल तुमचा आतला आवाज. जनसागराच्या साक्षीने, तुम्हालाही सापडेल तुमची गाज! इथे ठरेल, कोण होणार महाराष्ट्राचा आवाज!

कोण सहभागी होऊ शकेल? अठरा ते सव्वीस वर्षे या वयोगटातील प्रत्येक व्यक्ती.

पारितोषिकेः

प्रथम क्रमांकः ५१,०००/- आणि मुख्य करंडक

द्वितीयः ४१,०००/- आणि सन्मानपत्र

तृतीयः ३१,०००/- आणि सन्मानपत्र

त्याशिवाय उत्तेजनार्थ कमाल सात पारितोषिकेः

प्रत्येकी ११,०००/- रुपयांची, सन्मानपत्रासह.

सर्व सहभागी वक्त्यांना प्रमाणपत्र.

विषयः

१. यशवंतराव चव्हाण ते अजित पवार

२. ही लोकशाही की डेटाशाही?

३. जातपितृसत्ताक व्यवस्थेचं काय करायचं?

४. जोहरान ममदानी आपल्याकडे जिंकू शकतो?

५. विकास, पण नक्की कोणाचा?

६. समता आणि प्रेमातूनच उगवेल उद्याचे आनंदी जग.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तपशील आणि नियमांसाठी आधी गुगल फॉर्म भरणे आवश्यक.

त्यासाठी संपर्कः आनंदपीठ -

+919021274477

+919359003707