आनंदपीठ'ला फॉलो करा :

समर कॅम्प

मे २०२६ आनंदपीठ समर कॅम्प

आनंदपीठ समर कॅम्प- २०२६

तेरा ते एकोणीस वर्षे या वयोगटातील दोस्त या कॅम्पची आतुरतेने वाट बघत असतात. आनंदपीठावरचा हा दहावा कॅम्प, यामध्ये १३ ते १९ या वयोगटातील तब्बल ७६ मुलं-मुली एकूण २३ जिल्ह्यातून आलेली होती. हा कॅम्प ३ ते ८ मे रोजी आनंदपीठावर घेण्यात आला.

या कॅम्पसाठी नागराज मंजुळे, गिरिजा ओक, शाहू पाटोळे, राजू बाविस्कर, बाबा नदाफ, रविकांत तुपकर, वेदांती भागवत, भूषण कोरगावकर, उद्योजक भरत गीते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, संजय आवटे, विदुर महाजन, निमिष साने, डॉ. रेखा शेळके, हर्षल पाटील, शिव कदम, अनिकेत मोताळे, सोनाली शिंदे, सचिन दिवाण, नंदिनी जाधव, सचिन निंबाळकर, राहुल कदम, प्रियदर्शिनी मोरे, दिक्षांती गायकवाड, रिचा देवकर, डॉ. उज्ज्वला बर्वे, प्रभाकर भोसले, डॉ. नीरज जाधव, गणेश माने- देशमुख, अक्षय शिंपी, सचिन पांडुळे, डॉ. राजीव शिंदे, माधुरी आवटे अशा अनेक दिग्गजांनी मुलांशी गप्पा केल्या.

उमेश खाडे आणि सोनाली शिंदे या कॅम्पचे डायरेक्टर होते.

या कॅम्पसाठी एकूण २८३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी, ७६ मुला-मुलींची निवड आपण मुलाखतीतून निश्चित केली होती. भन्नाट प्रतिसाद या कॅम्पला मिळाला.

'तेंडल्या' चित्रपटाच्या टीमसोबत हा चित्रपट पाहाणे हा अनुभव फारच भारी होता.

'अविस्मरणीय असा हा कॅम्प ठरला.

आनंदपीठ समर कॅम्प 2026

समता आणि प्रेमातून उगवलेले आनंदी जग साकारण्यासाठीची पेरणी

आनंदपीठ कॅम्प@भालगुडी DAYS!

‘टीन एज’ वादळी असतं हे खरंच, पण हेच वय घडवतं, बिघडवतं… म्हणून, हा कॅम्प.

१३ ते १९ वर्षे या वयोगटातील मुला-मुलींसाठी

रील्सच्या दुनियेतून बाहेर पडून रिअल जग पाहायचंय? व्हाट्सॲप विद्यापीठातून बाहेर पडायचंय? स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हवीय? करीअरच्या भन्नाट वाटा दिसायला हव्यात? जात-पात-धर्म-लिंग या पल्याड ‘माणूस’ व्हायचंय? मुख्य म्हणजे, आनंदानं आयुष्य जगायचंय?

मग, आनंदपीठ कॅम्प तुमच्यासाठीच.

अनेक नामवंत इथं येतील. मुलांसोबत बागडतील. नव्या वाटा दाखवत जगणं समृद्ध करतील. कुठे असेल ही छावणी?

पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर. सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गरम्य डोंगरावर. शेजारी तिकोना, तुंग, लोहगड… इकडेच पवना डॅम, समोर हाडशी लेक.

कधी? ३ मे ते ८मे २०२६

आजच नोंदणी करा. गुगल फॉर्म भरून पाठवा.

मग मुलाखती होतील. पन्नास जणांनाच संधी.