आनंदपीठ'ला फॉलो करा :

उपक्रम

सर्वोदयी कार्यकर्ते आणि विचारवंत सचिन राव यांच्यासोबत "What is Politics?" या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र.

सर्वोदयी कार्यकर्ते आणि विचारवंत सचिन राव यांच्यासोबत "What is Politics?" या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र.

आनंदपीठ आयोजित सहावा युथ-कॅम्प

आनंदपीठ आयोजित सहावा युथ-कॅम्प आनंदपीठाच्या निसर्गरम्य परिसरात १२ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यशस्वीरित्या पार पडला. या कॅम्पमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, यवतमाळ, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आणि अहिल्यानगर या दहा जिल्ह्यांतील एकूण ५२ विद्यार्थी सहभागी झाले. अतिशय उत्साहपूर्ण आणि धुमधडाक्यात हा कॅम्प पार पडला.

विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी मार्गदर्शनपर सत्रे घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. नेचर वॉकदरम्यान विद्यार्थ्यांनी तिकोना किल्लाही सर केला. जळगावच्या विद्यार्थ्यांनी अहिराणी गाण्यावर पारंपरिक नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार केला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आनंदपीठाने व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिले.

-आनंदपीठ

Student's Politics - Anandpeeth Youth Camp

स्टुडंट्स पॉलिटिक्स- आनंदपीठ यूथ कॅम्प!

राजकारणात करियर घडवू पाहणाऱ्या तरुणांसाठी एकदिवशीय कॅम्प आनंदपीठावर आयोजित करण्यात आला. या कॅमसाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. राजकारणाच्या दृष्टीने वेगवेगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटीजही घेण्यात आल्या.

अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार आनंदपीठासोबत झूम मीटिंगच्या माध्यमातून गप्पा मारताना.

अमेरिकेतील खासदार श्रीनिवास ठाणेदार आनंदपीठासोबत झूम मीटिंगच्या माध्यमातून गप्पा मारताना.